वाडीया पार्क क्रीडा संकुल खेळाडूंसाठी ५० टक्के क्षमतेने खुले करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदन .

कोवीड १९ मुळे अहमदनगर शहरातील वाडीया पार्क क्रीडा संकुल है दिनांक १० जानेवारी २०२२ पासून बंद केले आहे . संपूर्ण राज्यात कोरोना डेल्टा आणि ओमायक्रोनमुळे परिस्थिती हाताबाहेर जाताना  दिसते आहे  . याला नियंत्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुन्हा एकदा कडक निर्बंध लादले असून याचा सर्वात जास्त फटका क्रीडा क्षेत्राला बसत आहे .त्यामुळे ५० टक्के क्षमतेने  वाडीया पार्क क्रीडा संकुल  खेळाडूसाठी  खुले करण्यासाठी सर्व  क्रीडा मित्रांनी व क्रीडा संघटनेने जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदन दिले . यावेळी दिनेश भालेराव , शैलेश गवळी , सचिन काळे , मुकुंद काशीद , सागर भिंगारदिवे , मनीष राठोड ,धर्मनाथ घोरपडे ,अविनाश काळे , अमित चव्हाण ,गुलजार शेख , शकील शेख , अतुल साठे आदी उपस्थित होते .
२०१९  पासून शासनाने जेव्हा जेव्हा निर्बंध कडक केले तेव्हा तेव्हा क्रीडा क्षेत्र पूर्णपणे बंद केले आहे . शासन जसे इतर क्षेत्रातील उदाहरणार्थ मॉल , सिनेमाघरे बस , ट्रेन , बाजारपेठा व अन्य क्षेत्राचा बारकाईने विचार करून प्रत्येकाला थोडीफार सूट देते पण यामधून क्रीडाक्षेत्र नेहमीच वगळण्यात आले आहे . यामुळे क्रीडा क्षेत्रातील अनेक घडामोडीवर त्याचा परिणाम होत असून अद्याप पर्यंत क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षक व क्रीडाशिक्षक खाजगी यांना शासनामार्फत कोणतीही मदत किंवा निधी प्राप्त झाला नाही .
शासनाने सरसकट वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुल अहमदनगर मैदान बंद केलेले आहे . परंतु शासनाने जर ५० % क्षमतेने जे खेळ बॉडी कॉन्टॅक्टमध्ये नाहीये त्या खेळांना किमान परवानगी शासनाने द्यावी . जे खेळाडू वर्षानुवर्षे मेहनत करतात . व मैदाने बंद झाली तर त्या खेळाडूंचा परफॉर्मन्स कमी होतो . एका बाजूला हॉटेल्स , मॉल . ५० % टक्क्याने सुरू आहेत . बाजारपेठेत कोणतीही कोरोना चे नियम कोणी पाळत नाहीये फक्त नियम हे खेळाडूंना च व खेळाडूंचा सराव महत्त्वाचा आहे . खेळाडू सराव करताना फिटनेस महत्त्वाचा आहे . तर तो करत असतो . एका बाजूला जिथे बंद लावला पाहिजे तेथे न लावता मैदानावर तीच बंधने का ? असा प्रश्न क्रीडा संघटनेने उपस्थित केला आहे .