विजेचा धक्का बसून शाळकरी मुलाचा मृत्यू .

 पाथर्डी तालुक्यातील एकुलत्या एक मुलाचा विजेचा तारेला चिटकून मृत्यू  झाला आहे  . काही दिवसांपूर्वी या मुलाचा बहिणीसह आईचा विहरीत बुडून मृत्यू झाला होता .  राम नारायण हिंगे असे मृत मुलाचे नाव असून तो आठवीचा वर्गात शिकत होता काळ शाळेत जाण्याऐवजी तो शेतात काम करण्यासाठी गेला होता . परंतु विजेचा तारेला चिटकून त्याचा मृत्यू झाला आहे . या बाबत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आलि आहे .
मुंगुसवाडे येथील नारायण हिंगे यांची पत्नी मुलीसह शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या दुपारचा वेळी हिंगे यांची मुलगी विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली परंतु ति पाय घसरून पाण्यात पडली ,मुलगी पाण्यात पडली म्हणून तिला वाचवण्यासाठी आईने पाण्यात उडी मारली परंतु एकाच दिवशी माय लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता , हि घटना ताजी असताना काल दुपारी  हिंगे यांचा एकुलता एक मुलगा राम हिंगे शाळेत जाण्याऐवजी शेतात काम करण्यासाठी गेला आणि दुर्दैवी विजेचा तारेला चिटकून त्याचा मृत्यू झाला . एकाच महिन्यात पत्नी सह दोन मुलांचा मृत्यू झाल्याने हिंगे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसला आहे . या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .