विलगीकरणातील दोनशे विद्यार्थी आले घरी

पारनेर तालुक्यातील टाकली ढोकेश्वर यायेथील नवोदय विद्यालयात २३ तारखेपासून विध्यार्थी , शिक्षक व कर्मचाऱ्यांसमवेत ८४  विद्यार्थी   कोरोना बाधित आढळून आले होते . या वेळी प्रशासनाने त्यांच्यावर लक्ष ठेऊन रविवारी ८४ विध्यर्थ्यांपैकी ५०  विद्यार्थी   कोरोना वर मात करत घरी परतले . त्यामुळे पालकांचा चेहऱ्यावर आनंद झळकला आहे . कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे . 
 
या विद्यालयीन उर्वरित ३४  विद्यार्थी   बुधवारी व गुरुवारी कोरोना मुक्त होऊन घरी परततील अशी माहिती वैधकीय अधीकारी डॉ प्रकाश लाळगे यांनी दिली . बाधित विध्यर्थ्यांवर पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार झाले , सर्व शाळा प्रशासन व निलेश लंके यांनी वयक्तिक लक्ष घालून संकट दूर केली आहे . अशी भावना  विद्यार्थी   व पालकांनी केली आहे , कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी प्रशासनाने पॉझिटिव्ह विध्यार्थी पारनेर रुग्णालयात दाखल केले . तर उर्वरित निगेटिव्ह विध्यर्थ्याना  विध्यालयात विलगीकरण केले होते . १२ दिवसांनी चाचणी निगेटिव्ह आल्याने २०० मुलांना वैद्यकीय तपासणी करून मंगळवारी पालकांचा स्वाधीन करण्यात आले .