वीज चोरी प्रकरणी साडे नऊ हजारांचा दंड

अहमदनगर — वीज चोरी केल्या प्रकरणी किसन यशवंतराव डोंगरे (रा . एमआयडीसी परिसर ) यांना साडे नऊ हजार रुपयांचा दंड अथवा ३० दिवसांची सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश पी व्ही चतुर  यांनी ठोठावली . ऍड सुरेश लगड यांनी महावितरण कंपनी कडून काम पहिले .
                   महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे एमआयडीसी कनिष्ठ अभियंता प्रकाश रामचंद्र शेळके व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी तारीख १३ जुलै २०१४ रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याचा सुमारास एमआयडीसी अहमदनगर येथील रहिवासी भागात वीज चोरीची तपासणी करत होते .  किसान डोंगरे यांनी महावितरण कंपनीचा मीटरला दिलेल्या वायरल कट मारून तेथून दुसरी वायर जोडून त्यांचा घरातील वरील मजल्यावरील व पाठीमागे खोलीत काळ्या रंगाचा वायरचा आकडा टाकून वीज चोरी करताना आढळून आले  .
                   दोन पंचासमक्ष वीज पुरवठा तोडून वीज चोरणीसाठी वापरलेली वायर जप्त  करण्यात आली. पंचनामा व जप्ती अहवाल जागेवरच तपासणी वेळी उपस्थित असलेली व्यक्ती किसन यशवंत डोंगरे यांचे भाडेकरी यांनी सही करण्यास व तो घेण्यास नकार दिला होता .  आरोपी डोंगरे यांनी अप्रामाणिक पणे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महावितरण  कंपनीचा विद्युत प्रणालीशी  अनधिकृत पणे  छेडछाड करून ४४३ कि. वॅट  चोरून वापरल्या बद्दल गुन्हा दाखल केला होता .जिल्हा न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली  फिर्यादी व साक्षीदार यांची साक्ष नोंदवून न्यायालयाने आरोपीस विद्युत कायद्यान्वये दोषी धरून साडे  नऊ हजार रुपये दंड किंवा ३० दिवस सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे .