शरद पवार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने निराधार वंचित घटकातील ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेटचे वाटप

थंडीनिमित्त शहरातील तापमानाचा पार खालवत असताना भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने निराधार व वंचित घटकातील 81 ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादीचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री ना. शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
भिंगार येथे निराधार व वंचित घटकातील अनेक ज्येष्ठ नागरिक उघड्यावर झोपून आपले जीवन जगत आहे. वाढती कडाक्याची थंडी पाहता अंगात हुडहुडी भरत आहे. उघड्यावर झोपणार्यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते रोकडेश्‍वर मंदिरात निराधार व गरजू घटकांना ब्लँकेट व मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, भिंगार राष्ट्रवादीचे संजय सपकाळ, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव अशोक बाबर, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, युवक उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, सर्वेश सपकाळ, प्रांजली सपकाळ, रमेश वराडे, दिपक बडदे, दिलीप ठोकळ, माजी प्राचार्य कैलास मोहिते, संभाजी भिंगारदिवे, सिध्दार्थ आढाव, अर्जुन बेरड, सुभाष होडगे, संपत बेरड, संतोष हजारे, मच्छिंद्र बेरड, सचिन दळवी, शिवम भंडारी, तुषार घाडगे, अविनाश जाधव, सुदाम गांधले, ईश्‍वर गवळी, अरुण वराडे, मच्छिंद्र भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात संजय सपकाळ म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाची शरद पवार यांचे विचार व मार्गदर्शनाखाली राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन कार्य सुरु आहे. राजकारणातील आदर्श व धोरणी नेतृत्व महाराष्ट्राला शरद पवार यांच्या रुपाने लाभले आहे. त्यांच्या विचारानाचे भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, वंचितांना मायेची ऊब देण्याच्या भावनेने हा उपक्रम दरवर्षी घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने भिंगारचे अनेक प्रश्‍न मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, ना. शरद पवार यांच्यासारखा दूरदृष्टी असलेला नेता महाराष्ट्राला लाभला, हा महाराष्ट्रातील जनतेचा अभिमान आहे. समाजकारण हा राष्ट्रवादी पक्षाचा पाया आहे. त्यांनी राजकारणात राहून समाजकारण करायला शिकवले. सर्वसामान्य नागरिक व शेतकर्यांना केंद्रबिंदू मानून त्यांनी राष्ट्रवादीची मुहुर्तमेढ रोवली. त्यांचा अनुभव व अभ्यास देशाला दिशा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. माणिक विधाते यांनी दरवर्षी संजय सपकाळ सामाजिक भावनेने हा कार्यक्रम घेत असतात. वर्षभर त्यांचे विविध माध्यमातून सामाजिक उपक्रमासह भिगारमधील प्रश्‍न सोडविण्यासाठी पाठपुरावा सातत्याने सुरु असतो. वंचित व दुर्बल घटकांना मदत करण्याची भावना राष्ट्रवादीच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.