शिक्षण क्षेत्रात विद्यादानाचे कार्य करणार्‍या महिला शिक्षिका व प्राध्यापिकांना पुरस्कार जाहीर

शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवार दि.3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 191 वी जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिवस साजरा केला जाणार आहे. राष्ट्रवादीच्या वतीने शहरात शिक्षण क्षेत्रात विद्यादानाचे पवित्र कार्य करणार्‍या महिला शिक्षिका व प्राध्यापिकांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी दिली.
आमदार अरुणकाका जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुरस्कारार्थी महिला शिक्षिका व प्राध्यापिकांचा सन्मान होणार आहे. राष्ट्रवादीच्या वतीने शहरातील शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्यांकडून महिला शिक्षकांचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. यामधील निवडक महिला शिक्षक, प्राध्यापिकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये डॉ. प्रतिमा शेळके-जोगदंड, प्रभावती पादीर (न्यु आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालय, डॉ. स्मिता भुसे, जयश्री पवार (पेमराज सारडा महाविद्यालय), अनिता कराळे, ज्योत्सना देशमुख (राधाबाई काळे महिला महाविद्यालय), सुजाता लोंढे, सुलक्षना गायकवाड (अहमदनगर महाविद्यालय), प्रियंका खुल (न्यु लॉ कॉलेज), गायत्री रायपेल्ली (रुपीबाई बोरा स्कूल), वैशाली वाघ (अशोकभाऊ फिरोदिया), सुषमा चिटमिल (भाऊसाहेब फिरोदिया), वैशाली मेहेत्रे-बोरुडे (ग.ज. चितांबर), राधिका जेऊरकर (शेठ नंदलाल धुत), गितांजली भावे (भिंगार हायस्कूल), सुरेखा कजबे-नजान (सरस्वती विद्या मंदिर), कांचन गावडे (पेमराज गुगळे), रुपाली शिंदे (भाग्योदय विद्यालय, केडगाव) शारदा पोखरकर (आनंद विद्यालय), संगिता ठुबे, वैशाली जाधव-दारकुंडे (रेसिडेन्शिअल विद्यालय) या महिला शिक्षिका व प्राध्यापिकांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आयुर्वेद महाविद्यालय येथे सोमवारी सकाळी 10 वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असून, सर्वांना कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.