शिवसेनेचा झटका महापालिका प्रशासनाचे डोके ठिकाणावर विद्युत पोल चोरणारा अधिकारी मेहेर लहारे अखेर निलंबित

महापालिकेतील महिलांची छेडछाड शारीरिक सुखाची मागणी अश्लील चाळे करणाऱ्या तत्कालीन अस्थापना प्रमुख मेहेर लहारे याची काही महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या आंदोलनामुळे त्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती आणि आता सिद्धी बाग येथील उद्यानातून सौर उर्जेवर चालणारे विद्युत पोल चोरी करण्याच्या उद्देशाने कापून विकण्याच्या प्रयत्नात असताना लहारे याच्या साथीदारांना काही मनपा कर्मचार्‍यांनी रंगेहात पकडले होते त्याबाबत सर्व पुरावे फोटो कॉल रेकॉर्डिंग आयुक्त उपायुक्त यांना पुरावे म्हणून सादर करण्यात आले होते .परंतु राजकीय पाठिंबा आणि महापालिकेतील अधिकारी यांचा पाठिंबा च्या जोरावर त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नव्हती. परंतु शिवसेनेने आज आयुक्त दालनात ठिय्या आंदोलन केले त्या आंनदोलनाचे रुद्र रूप पाहून महापालिकेचे डोके ठिकाणावर आले आणि तात्काळ मेहेर लहारे याला महापालिका आयुक्त यांनी निलंबित केले, पुढील दोन दिवसात गुन्हा दाखल करणार असल्याचे आश्वासन दिले. ज्या ज्या वेळी भ्रष्टाचार आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल त्या त्या वेळी शिवसेना महापालिकेत शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार. यावेळी माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते, जिल्हा युवासेनेचे विक्रम राठोड ,महिला संघटक स्मिता अष्टेकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, नगरसेवक परेश लोखंडे ,नगरसेवक योगीराज गाडे, नगरसेवक काका शेळके माजी महापौर अभिषेक कळमकर व शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते .