शिवसेनेचे नगर सेवक बाळासाहेब बोराटे यांची आयुक्तांवर टीका .

नगर  शहरात  रस्त्यांचा विविध कामांचे उदघाटन होत आहे त्या कामात आयुक्तांनी भुयारी गटार प्रकल्प ,फेज २ , स्मार्ट एल ए डी प्रकल्प अशी विविध कामे करताना रस्ते खोदली जातात . नवीन रस्त्याचे काम करत असताना  आयुक्त्यांनीं हि सर्व कामे पूर्ण झाली कि नाही याची शहनिशा करावी व नंतर नवीन रस्त्यांचे  काम पूर्णत्वास न्यावे अशी टीका त्यांनी केली.
         यावेळी बोलताना बोराटे म्हणाले नगर शहरातील लोकांनी स्त्यांचा बाबतीत बराच  त्रास सहन केला असून महापालिका प्रशासन किंवा ठेकेदारांचा ठिसूळ कारभारामुळे भुयारीं गटार प्रकल्प किंवा पाणी प्रकल्पाचा कामामुळे लोकांना रस्त्यांपासून वंचित ठेवलं गेलं . गेली दोन तीनवर्षापूर्वी मंजूर झालेल्या रस्त्यांचा कामाचे उदघाटन झाले असून .या रस्त्याचे काम चांगल्या प्रतीचे व्हावे अशी ताकीद त्यांनी ठेकेदाराला केली .
       नगर शहरा मध्ये विविध  विकास कामांचे उदघाटन होत असताना वेळो वेळी रस्ता खोदला जातो परिणामस्वरूप स्थानिक लोकांना , व्यावसायिकांना रस्त्या मुळे त्रास सहन करावा लागतो . महापालिका प्रशासनाकडून विविध प्रकल्प राबवली जातात परंत्तू प्रत्येक वेळी रस्ता खोदल्याने रस्ता लवकर खराब होतो . यांचा त्रास लोकांना वर्षानुवर्षे सहन करावा लागतो  . म्हणून रस्त्याची कामे पूर्णत्वास जाण्यापूर्वी त्या त्या भागात राबवलेली प्रकल्पे पूर्ण करावी व नंतर रस्त्यांची कामे पूर्ण करावी अशी चर्चा शहरा मध्ये स्थानीय लोक करताना दिसत आहेत