शिवसेनेच्या शहर प्रमुख पदी संभाजी कदम .

शिवसेने ने नेहमीच सर्वसामान्यांसाठी प्रश्नांसाठी आवाज उठविला आहे . नागरिकांचा मदतीसाठी नेहमीच शिवसैनिक धावून गेले आहेत . काम करणाऱ्या पक्षाने नेहमीच पदाचा माध्यमांतून त्यांचा योग्य तो गैरव केला आहे . माजी शहर प्रमुख राहिलेले संभाजी कदम यांनी पक्ष वाढीसाठी अनेक उपक्रम राबवले . त्यामुळे अनेक युवक सेनेत दाखल झाले होते . आत्ता पुन्हा त्यांची शिवसेना शहर प्रमुख पदी निवड हि पक्षातील त्यांचा योगदानाची पावती आहे . आताही ते या पदाचा माध्यमातून पक्षाचे कार्य अधिक व्यापक करतील असा विश्वास आहे .

पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी नेहमीच चांगलं काम करणाऱ्या लोकांचा पाठीशी उभे राहिले आहेत. शहरातील युवकांचे पाठबळ हे त्यांचा मागे राहून शिवसेनेचे विचार सर्व सामान्यांना पर्यंत पोहचावे असे प्रतिपादन युवा सेनेचे राज्य सह सचिव तथा जिल्हा प्रमुख विक्रम राठोड यांनी केले . शिवसेनेचा वतीने शिवालय येथे शिवसेना शहर प्रमुख पदी संभाजी कदम यांची निवड झाल्या याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला होता . या प्रसंगी जिल्हा प्रमुख विक्रम राठोड नगर सेवक दत्ता कावरे , सचिन शिंदे , प्रशांत गायकवाड मदन आढाव , संग्राम शेळके , उपशहर प्रमुख संतोष गेनप्पा , युवा सेना शहर प्रमुख हर्षवर्धन कोतकर , महिला शहर अध्यक्ष अरुणा गोयल ,अंबादास शिंदे , शिवाजी कदम , कुणाल खैरे , शेखर आढाव , पप्पू थोरात , दादासाहेब घोडके , सानी अहुजा , प्रमोद जाधव आदी उपस्थित होते .

या वेळी संभाजी कदम म्हणाले शिवसेना उपनेते स्व . अनिल राठोड यांनी शहरातील नागरिकांसाठी उभारलेले मोठे कार्य यापुढे आपण सुरु ठेवू . सर्व नगरसेवक , माजी नगरसेवक , पदाधिकारी , शिवसैनिक यांना बरोबर घेऊन शिवसेना पक्ष वाढीसाठी काम करु . तसेच शिवसेनेच्या शहरातील विविध भागात शाखा वाढविण्यासाठी प्रयत्न करु . शिवसेनेला नगरमध्ये मानणारा मोठा वर्ग आहे , सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन शिंदे यांनी केले तर मदन आढाव यांनी आभार मानले .