शेतकरी स्वप्निल खाडे यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र

जामखेड —-   शेतमालाला हमी भाव मिळत नाही, तसेच वारंवार शेतकऱ्यांच्या आत्महत्या व त्यातच सरकारने वाईन विक्री करण्यास परवानगी दिली म्हणून गांजा उत्पादन केले तर सरकारला बक्कळ महसूल मिळेल व शेतकरी सुखावेल अशी मागणी जामखेड तालुक्यातील शेतकरी  स्वप्नील खाडे यांनी मुख्यमंत्र्याना पत्र पाठवून केली आहे.

शेतीमालाला बाजार भाव मिळत नसल्याने खते बी-बियाणे यांचे भाव वाढत चालल्याने शेती करणे परवडत नाही आदरणीय साहेब कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्या करून मृत्यू पावला . साहेब त्याने पिकवलेले अन्न खाऊन देश जगला पण माझा बळीराजा टिकला पाहिजे असा निर्णय अद्याप निर्णय कोणी घेतला नाही, शेतमालाला हमी भाव मिळत नाही व हमी भाव नसल्यामुळे मशागतीसाठी 10 रुपये खर्च केलेले पीक 2 रुपयात द्यावे लागते ,त्याने कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्या करतो.

शासनाने सुपर मार्केटमध्ये व किराणा दुकानांमध्ये तसेच मार्केट बाजार मध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी दिली, त्यामुळे आता वाईन कुठेही उपलब्ध होईल त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची कितपत भले होईल ही आशा भाबडी .असे करून जर शासनाचे उत्पन्न वाढणार असेल तर राज्यातील शेतकऱ्यांना गांजा पिके घेण्यास परवानगी देण्यास काय हरकत आहे . आतापर्यंत या देशात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण त्यांच्या दुःखाची हमीभाव देऊन कोणीही त्याचे सांत्वन करू शकल नाही . मार्केटमध्ये वाईन सारख्या पदार्थ विक्रीतून महसूल प्राप्त होऊन तमाम नागरिकांचे भलं होत असेल तर गांजा लागवडीतून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळेल व शेतकऱ्यांच्या हातात काही थोडेफार पैसे येतील शेतीचे आर्थिक नियोजन आणि शेतकऱ्यांची ढासळती परिस्थिती सुधारेल.  गांजा उत्पादनास परवानगी दिल्यास कृषिक्षेत्रात उभारी मिळून प्रोत्साहन मिळेल तसेच शेतमालाला हमी भाव अस पडणार नाही व शेतकरी आत्महत्या करणार नाही.अस या शेतकऱ्याने पत्रात म्हंटले आहे.तसेच जर शासनाने ज्या पद्धतीने वाईन किराणा दुकानात ठेवण्याची परवानगी दिली तशीच जर गांजा लागवडीसाठी परवानगी दिली तर गांजा लावू अस ही या शेतकऱ्याचे म्हणणे आहे.