संचारबंदी चे उल्लंघन ; तिघांवर गुन्हा दाखल

नगर —जिल्हाधीकाऱ्याच्या संचार बंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी शहरातील तीन व्यवसायिकांविरोधात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . या  कारवाई मुले व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे . लतीफ बशीर शेख (वय ४२ रा. दरगादायरा ,मुकुंदनगर ), उमेश मिसळ (वय ३३ , रा. डावरेगल्ली , नगर), अशोक गवळी (वय ४२ वाकोडी .नगर )अशी आरोपींची नावे१ आहेत . पो कॉ श्रीकांत खताडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे . 
 
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यास ठी जिल्ह्याधिकाऱ्यानी रात्री चा संचार बंदी चा आदेश काढला आहे . १२ जानेवारी रोजी कोतवाली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक इंगळे , सोनवणे , गोरे , श्रीकांत खताडे ,शेरकर , कदम,कुलकर्णी हे गस्त घालत असताना लतीफ शैउख याने त्यांचा ताब्यातील अंबर प्लाझा जवळील पानटपरी , उमेश मिसाळ याने त्याचा ताब्यातील गणेश दूध सेंटर ची  गाडी , फुलसौंदर येथे तर गवळी याने त्याचा ताब्यातील इम्पिरिअल चौकातील गुड लक हॉटेल हे संचार बंदीचे आदेश असताना रात्री पावणे अकरा ते सव्वा अकरा चा दरम्यान सुरु ठेवल्याचे आढळून आले असे फिर्यादीत म्हटले आहे .