संदिप नर्के यांना यावर्षीचा ग्लोबल स्कूल अवॉर्ड प्रदान

पुण्यातील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर श्री संदिप नर्के यांना यावर्षीचा ग्लोबल स्कूल अवॉर्ड २०२१ याने सन्मानित करण्यात आले आहे आशिया खंडातील सर्वात मोठी व्हर्चुअल एज्युकेशनल कॉन्फरन्स आणि अवॉर्ड शो नुकताच ग्लोबल स्कूल अवॉर्ड २०२१ सी.ई.ओ. २ आणि ३, लुधियाना, पंजाब येथे दिमाखदार सोहळ्यात पार पडला त्यात सोनई येथील यश अकॅडमी सी.बी.एस.ई. स्कूल मधील नृत्य शिक्षक श्री. संदिप नर्के यांना नुकताच या वर्षीचा ग्लोबल स्कूल अवॉर्ड २०२१ सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला त्याचे आयोजन एडूनेशन टीव्ही यांनी केले होते त्यात मि. सूनील अरोरा कॉर्पोरेट ट्रेनर आणि लाइफ कोच, लॉर्ड दिलजीत राणा एम.पी. हाऊस ऑफ लोर्ड युनायटेड किंगडम (UK) आणि दीपक सिंग कल्चरल ऍम्बेसिटर साऊथ आफ्रिका यांनी मोलाचे मार्गदर्शन केले संदिप नर्के यांना या वर्षी एकूण चार अवॉर्ड मिळाले आहेत नुकताच त्यांना बेस्ट टिचर अवॉर्ड, इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड आणि बेस्ट कोरिओग्राफर अवॉर्ड हे देखील त्यांना याच वर्षी मिळाले आहेत आणि या वर्षीचा ग्लोबल ॲवॉर्ड देखील त्यांना नुकताच सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहे संदिप नर्के हे गेली अठ्ठावीस वर्षांपासून नृत्य क्षेत्रात कोरीओग्राफर म्हणून यशस्वीरित्या काम करीत आहेत.