दिव्यांगांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी महसूल मंत्री. बाळासाहेब थोरात यांना निवेदन.

दिव्यांगना शासकीय सेवेत समावून घेण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देताना शिल्पाताई अशोकराव दुसुंगे समवेत सौ. वैद्यताई, फरिदा शेख  व इतर महिला उपस्थित होते मागील दोन वर्षापासून आपले राज्य, देश तसेच संबंध जग कोरोना शीझुंज देत असून तरीदेखील आपल्या नेतृत्वाखाली आपल्या राज्यात आपल्या सरकारने विविध योजना राबवून गोरगरीब जनतेची  मदत केली  आहे. गोरगरीब जनतेला मदत करून त्यांना या कोरोणाच्या परिस्थितीत सावरण्यास मदत केली त्यामुळे  निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे की दिव्यांगांना बरेच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे दिव्यांगांना  रेल्वे, बस, विमान इतर अनेक ठिकाणी प्रथम प्राधान्य देण्यात यावे. तसेच ज्या अपंगांनी आपल्या विविध क्षेत्रात नावलौकिक केलेले आहे त्यांना मुख्यमंत्री व राष्ट्रपतींनी गौरवलेले आहे अशा अपंग व्यक्तींना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.