सतरा पोलिसांना कोरोना संसर्ग .

पारनेर (दि.१९) – – तालुक्यात कोरोनाचा तिसऱ्या लाटेचा चांगलाच प्रभाव पडलेला दिसत आहे . टाकली ढोकेश्वर विद्यालयातील कर्मचारी व विध्यार्थी मिळून सगळे ९२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता . आता तुला पाठोपाठ पारनेर पोलीस ठाण्यातही कोरोना ने शिरकाव केला आहे . अधिकारी व कर्मचारी मिळून सगळे १७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे , त्यामुळे तालुक्यात कोरोना झपाट्याने वाढत असल्याने भीती व्यक्त होत आहे .

मागील काही दिवसापासून टाकली ढोकेश्वर येथील नवोदय विध्यालायातील विध्यार्थ्यांना व शिक्षकांना कोरोनाची लागण झाली होती , परंतु त्या नंतर कोरोना बाधितांची संख्या घटलेली दिसून आली होती . मात्र आता पुन्हा पारनेर पोलीस ठाण्यात कोरोना ने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला असल्याने नागरिकांत खळबळ उडाली आहे , दोन अधिकारी व १५ कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत ,

नवोदय विद्यालयात बंदोबस्तासाठी असलेले कर्मचारी आधी कोरोना बाधित झाले , त्या नंतर कर्मचाऱ्यांचा असलेला बंदोबस्त व दरोरोज चा असलेला निकटचा सहवास या मुळे पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे .