सद्भावना यात्रेचे टीम लीडर सशाला अहिरे यांचे ओरिसा येथे अपघाती निधन

भारत बांग्लादेश सदभावना यात्रेचे टीम  लीडर विशाल अहिरे यांचा ओरिसात झालेल्या भीषण अपघात त्यांचा मृत्यू झाला . इतर तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर कोलकाता येथे उपचार सुरु आहे . जखमींमध्ये अजय वाबळे , संतोष धर्माधिकारी , योगेश जाधव यांचा समावेश आहे  . विशाल चा अपघातानंतर नागरकरांवर शोककळा पसरली आहे . 
 महात्मा गांधी जयंतीचे  औचित्त साधून २  ऑक्टोबर रोजी अहमदनगर चा भुईकोट किल्ला मैदानातून तिरंग्याला सलामी देत  आणि महात्मा गांधींना अभिवादन करून समाजसेवक अण्णा हजारे व पदमश्री पोपटराव पवार आदी मान्यवरांचा उपस्थित जेष्ठ गांधीवादी  स्व. डॉ एस एन सुब्बाराव याना अभिवादन करून अहमनगर ते नवलाखी (बांगलादेश ) सदभावना सायकल यात्रेचा प्रारंभ झाला होता .  या सायकल यात्रेचे संपूर्ण नियोजन आणि नेतृत्व विशाल अहिरे यांच्याकडे होते . यात्रा पूर्ण सुरक्षित आणि यशस्वी पने हाताळण्यात विशाल अहिरे यांनी मोठे कष्ट घेतले . मात्र दुर्दैवाने शनिवार रात्री ओरिसा राज्यात भुवनेश्वर येथे झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला .