स्वराज्य बहुजन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन.

पाटील पदाचा दुरूपयोग करणाऱ्या इसमास बडतर्फ करण्याची मागणी.

श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा (खरंतवाडी) या गावातील पोलीस पाटील असणाऱ्या सुनील शिवणकर हे आपल्या पदाचा गैर उपयोग करून त्यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केले असुन गुन्हा दाखल झालेला आहे व महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार देखील दाखल असल्याने या पोलीस पाटलाला बडतर्फ करून पदावरून हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी स्वराज्य बहुजन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण करताना स्वराज्य बहुजन सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम दगडे पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रघुनाथ भवार, महिला प्रदेश अध्यक्ष स्वातीताई शिवले, महिला जिल्हा अध्यक्ष रेखाताई भंडारे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष देवराम महस्के, अशोक मेडकर, योगेश टकले, आशाताई कांबळे, मेघाताई गबारे, शर्मिलाताई चव्हाण, किरणताई विवके, सुलाबाई निकम, शालन गायकवाड, पार्वती उलहारे, सीताबाई डांगे, जिजाबाई बावस्कर, शांताराम भिडे, शिवाजी शिवले, शरद गवारे, विजय कोतकर, सुरेश शिवले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

गावातील पोलीस पाटील या पदावर असणारा इसम सुनील प्रकाश शिवणकर हा 2008 पासून या पदावर काम करत आहे तरी या इसमावर 14 जून 2019 रोजी सरकारी जागेवर अतिक्रमण केले म्हणून गुन्हा दाखल झाला आहे व 10 मार्च 2021 रोजी महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार देखील दाखल आहे हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तरी अशा इसमाला सरकारी पदावर राहण्याचा काही अधिकार नाही सरकारी पदाचा गैरवापर करत आहे व सरकारी जमीन बळकावण्याचा प्रयत्न देखील करत आहे अशा व्यक्तींना पदावर ठेवणे समाजाच्या हिताचे नाही ते पद खूप संवेदनशील व जबाबदारीचे पद आहे परंतु हा इसम त्याचा दुरुपयोग करत आहे पोलीस पाटील शिवणकर या इसमास गावकामगार पोलीस पाटील या पदावरून बडतर्फ करण्यात यावे अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदना द्वारे देण्यात आला आहे.