स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या जिल्हा मुख्याध्यापक प्रमुख पदी मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर यांची नियुक्ती.
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक प्रमुख पदी बजरंग विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर यांची नियुक्ती राज्याध्यक्ष के.पी पाटील सर राज्य कार्यकारिणी तथा जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे सर व जिल्हा कार्यकारणी यांच्या मान्यतेने करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष शिंदे यांच्या हस्ते अमोल शिरसागर याना नियुक्तीपत्र देन्यात आले यावेळी जिल्हा सचिव समीर पठाण, जिल्हा संघटक मुख्याध्यापक महेश भगत, भारत गोल्हार, गणेश शिंदे, निलेशकुमार बांगर, अक्षय पतंगे, जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे, मुख्याध्यापक दत्तात्रय झगडे, शंकर चवलवाड सर, रावसाहेब आल्हाट सर, मकरंद हिंगे सर, श्रीमती शीतल मोरे मॅडम, आश्विनी बेरड मॅडम, छाया क्षीरसागर मॅडम, सुलोचना क्षीरसागर मॅडम, ऋतुजा हारकर मॅडम, प्रेरणा साळी मॅडम आदीसह शिक्षक बंधू मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी शिंदे म्हणाले की मुख्याध्यापक क्षीरसागर सर यांच्या माध्यमातून मुख्याध्यापकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून संघटनेच्या माध्यमातून शिक्षकाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. शिक्षकांना स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या नेतृत्वावर भूमिकेवर विश्वास असल्या कारणामुळे जिल्ह्यातील अनेक प्राध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेमध्ये प्रवेश करत आहे. स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या माध्यमातून विनामूल्य शिक्षकांची कामे केली जातात शिक्षकांच्या अडचणीवर मार्गदर्शन केले जाते. मुख्याध्यापक क्षीरसागर सर यांच्या नियुक्तीमुळे संघटनेला निश्चितच पाठबळ मिळणार असून शिक्षकांना बरोबर घेऊन कार्य करण्यासाठी एक चळवळ उभी करणार आहोत व भविष्यात अहमदनगर शहरातील असंख्य महिला शिक्षिका स्वाभिमानी शिक्षक संघटनेमध्ये प्रवेश करणार आहेत असे शिंदे म्हणाले याप्रसंगी अमोल क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मुख्याध्यापकांचे प्रश्न शिक्षकांचे प्रश्न अल्पसंख्याक शाळांचे प्रश्न अंशतः अनुदानित शिक्षकांचे प्रश्न जुनी पेन्शन योजना संदर्भातील आंदोलन अशा असंख्य प्रश्नावर अहमदनगर जिल्ह्यात शिक्षकांची एक फळी उभी करून शिक्षकांना न्याय देण्याचे काम स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या माध्यमातून राज्याध्यक्ष के.पी पाटील यांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे सर जिल्हा कार्यकारणी यांच्या माध्यमातून भविष्यात केले जाणार आहे…………..