हनुमान चालीसा बंद केल्याचे खोटे भासून समाजाच्या भावना दूषित करून धार्मिक दंगली घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी.

अलमगीर येथे हिंदू-मुस्लीम गुण्यागोविंदाने राहत असून काही समाजकंटक लोक जाणून-बुजून यात विष कालवण्याचा प्रयत्न करीत आहे 14 जानेवारी रोजी घडलेली घटनेची सत्यता अशी की आम्ही आमच्या राहत्या घराच्या टेरेसवर पतंग उडवीत असताना सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान आमच्या समोरील कॉलनीत मुंडे यांच्या टेरेसवर वसंत मुंडे, अजय गारदे व त्यांचे काही मित्र तेथे पतंग उडवीत होते व तेथे त्यांनी सीडी सिस्टीम लावलेला होता या सीडी सिस्टीमवर सकाळपासून गाणी व धार्मिक गीत लावलेले होते परंतु संध्याकाळी ६ वाजेच्या नंतर त्या सीडी सिस्टीमवर मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील अशा प्रकारची गाणी त्यांनी लावण्यास सुरुवात केली. तरी हे गाणे सुरू असताना सोहेब मोमिन  व त्यांचा भाऊ सोहेल मोमीन दोघे  मुंडे यांच्या टेरेसवर जाऊन तेथे उभे असलेले अजय गारदे यांना सांगितले की अशी गाणी आपण वाजवू नका व त्यांना सीडी सिस्टीम बंद करण्यास सांगितल्यास अजय गारर्दे व त्यांचे साथीदार यांनी आम्हाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व धक्काबुक्की केली तरी आम्ही त्यांचे एकही न ऐकता बळजबरीने सीडी सिस्टीम बंद केली व तिथून निघून आलो ही माहिती परिसरात पसरताच तेथे गर्दी जमा झाली त्या गर्दीचा फायदा घेत भागचंद तागडकर व अजय गारदे यांनी लोकांना सांगितले की हे मुसलमान आता हनुमान चाळीसा लावण्यास विरोध करत आहे असे सांगून लोकांची दिशाभूल करून जमलेल्या सर्व लोकांना भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले व भिंगार शहर व अहमदनगर शहरातील व्हाट्सअप फेसबुक द्वारे चुकीची बातमी पसरून राजकीय तसेच धार्मिक संघटनेचा लोकांना बोलावून दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे वातावरणाची निर्मिती केली व आमच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले तरी परिसरातील ठिकाणी सीडी सिस्टीमवर हनुमान चालीसा चालू असताना कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही व कोठेही कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही तरी या भागचंद तागडकर व अजय गारदे हे दोघेही राजकारणात सक्रिय असून दोघांच्याही कुटुंबियातील व्यक्ती नागरदेवळे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी जाणून बुजून लोकांना खोटी माहिती देऊन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले तसेच आमच्या परिसरात हिंदू-मुस्लीम एकत्र राहत असल्याने आमच्या कोणत्याही प्रकारचा वाद नाही तरी किरकोळ वाद झाल्यास तागडकर हा किरकोळ भांडणाचे धार्मिक वळण देण्याचे काम सतत करीत असतो त्यामूळे पुढे धार्मिक स्वरूपाची मोठी घटना घडल्यास त्या घटनेस भागचंद तागडकर हा व्यक्ती जबाबदार असेल तरी या घटनेचे अहमदनगर शहरात मीडियाद्वारे चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचत आहे त्याचे एक उदाहरण म्हणजे मिलिंद मुबारक कर यांनी मुस्लिम लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील अशा प्रकारची फेसबुक पोस्ट केलेली आहे त्यामुळे सर्व समाजात चुकीचा संदेश जात आहे तरी या घटनेची योग्य ती चौकशी करून वरील सर्व व्यक्तींवर योग्य ती कारवाई करावी तसेच शहरामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत असलेले दूषित वातावरण थांबवण्याची मागणीचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी जाहिद सय्यद व समस्त आलमगीर येथे नागरीक उपस्थित होते.