२९ व ३० डिसेबरला रेल्वेची हायस्पीड चाचणी

अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ नवीन रेल्वेमार्गासाठी येणार्‍या खर्चातील केंद्र व राज्य सरकारच्या निधीचे समप्रमाण राखण्यासाठी राज्य सरकारच्या हिश्शाचा असलेला ९० कोटी १३ लाख रुपयांचा आणखी निधी महाविकास आघाडी सरकारने उपलब्ध करून दिला आहे. येत्या २९ व ३० डिसेबरला हायस्पीड चाचणी  होणार असल्याची माहिती आहे.नगर-बीड-परळी रेल्वे मार्गा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे.

या रेल्वेमार्गाचे काम प्रगतीपथावर असून नगर ते आष्टी पहिली रेल्वे धावली. रेल्वे पटरीवर चाचणी करण्यात आली. गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्हा जिल्हावासियांना रेल्वेचे वेध लागले आहे. मात्र केंद्रात मोदी सत्तेत आले अन् रेल्वे कामाला भरमसाठ निधी मिळू लागला. त्यामुळे बीड रेल्वेचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार असल्याचे चित्र दिसत आहे. येत्या काही दिवसांमध्ये नगर ते आष्टी या ६० किलोमीटर मार्गावर हाय स्पीड रेल्वे चाचणी घेण्यात येणार आहे. येत्या २९ व ३० डिसेंबर रोजी नगर ते आष्टी रेल्वे यांसी १२० किमी प्रति तास वेगाने चाचणी घेण्यात येणार असल्याचे आवाहन रेल्वे विभागाने एका परिपत्रकाद्वारे केले आहे.