४० फूट उंच इमारतीच्या छतावरून पडलेल्या बांधकाम मजुराचा मृत्यू

राहुरी : चाळीस फूट उंच इमारतीवरून खाली पडलेल्या गवंडी मजुराचा मृत्यू झाला आहे . गुरुवारी रात्री राहुरी शहरात ही घटना घडली . राजललन आदवाशी , वय ४० रा . मध्यप्रदेश हा गवंडी काम करणारा मजूर राहुरी शहरात असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आपल्या कुटुंबासह राहत होता . गुरुवारी रात्री राजलालन हा इमारतीच्या छतावर गेला होता . रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास छतावरून खाली पडल्याने राजलालन गंभीर जखमी झाला . यावेळी परिसरातील काही तरुणांनी जखमी राजलालनला तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले . मात्र , उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली . माहिती मिळताच ग्रामीण राजलालनचा मृत्यू झाल्याची रुग्णालयात उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला . राहुरी येथे शवविच्छेदनानंतर राजलालनचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला . या घटनेची राहुरी पोलिसात आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली . पुढील तपास पोलीस नाईक शिवाजी खरात करीत आहेत . दरम्यान , या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . या दुर्घटनेमुळे गवंडी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .