हजार कोटींचा स्कॅम! ‘दुप्पट परतावा’चं स्वप्न दाखवून कंपनी पळाली – गुंतवणूकदार हवालदिल!

नगर-पुण्यात खळबळजनक फसवणूक!

💸
हजार कोटींचा स्कॅम! ‘दुप्पट परतावा’चं स्वप्न दाखवून कंपनी पळाली – गुंतवणूकदार हवालदिल!

📍 नगर-पुण्यात खळबळजनक फसवणूक!

पारनेर तालुक्यातील सुपा येथून सुरू झालेल्या एका ‘हाय-रिटर्न’ वचन देणाऱ्या कंपनीने पुणे व नगर जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना तब्बल ₹1000 कोटींचा गंडा घातला आहे. सुरुवातीला महिन्याला 10-12% परतावा देत लोकांचा विश्वास संपादन केला आणि नंतर कंपनीने गाशा गुंडाळत मालक दुबईला फरार झाला!

👥 कोण फसले?

  • सेवानिवृत्त नागरिक
  • बचतीचे पैसे गुंतवलेले कुटुंब
  • कर्ज घेऊन गुंतवणूक करणारे उद्योजक
  • जमिनी विकून पैसे लावलेले गुंतवणूकदार

📉 काय घडलं?

  • 1 लाख गुंतविल्यावर महिन्याला 10-12 हजार परतावा
  • सुरूवातीला परतावा दिला, लोकांचा विश्वास बसला
  • मग कोट्यवधींच्या ठेवी गोळा
  • मागील 2-3 महिन्यांपासून एक रुपयाही मिळालेला नाही
  • आता कंपनीच गायब, ऑफिस बंद, पोलिसांत धाव!

🚨 3 मोठ्या कंपन्या गडगडल्या!
सुपा परिसरात अशा तीन कंपन्यांनी कार्यालये थाटून कोट्यवधींच्या ठेवी घेतल्या. आता सर्वच गायब!

🔍 गंभीर इशारा:
यापुढे ‘दामदुप्पट परतावा’ ऐकून गुंतवणूक करण्याआधी पडताळणी करा!

📲 ही बातमी शेअर करा, इतरांनाही सावध करा!