अज्ञात चोरट्यांची धाडसी चोरी
राहुरी —- तालूक्यातील ब्राम्हणगाव भांड येथील रमेश वारूळे यांच्या घरात दिनांक २ फेब्रूवारी रोजी अज्ञात भामट्यांनी धाडसी चोरी केली. भामट्यांनी रोख रक्कमेसह सुमारे चार लाख रूपयांचे सोन्याचे दागीने चोरून नेले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.