अनिल कातकडे यांच्या पथकांचा दारू अड्ड्यांवर छापा
नगर —- नगर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांचा पथकाने भींगार कॅम्प पोलिसांचा हद्दीतील कापूरवाडी शिवारात ,गोपाळवस्ती , मोरे मळा, येथे गावठी दारू अड्ड्यांवर छापा टाकून कारवाई केली . या छाप्यात ३० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल नष्ठ करण्यात आला . ,
कापूरवाडी शिवारात महिला कळंबे पवार हि विना परवाना बेकायदा गावठी हातभट्टी दारू जवळ बाळगून तिची विक्री करत असल्याची माहिती उपाधीक्षक कातकडे यांना मिळाली , त्यामुळे त्यांचा सुचने नुसार कात कडे यांचा पथकाने गोपाळवस्ती , मोरे मळा, येथे छापा टाकला व यावेळी ४०० रुपयांचा एक ड्रम ५ लिटर क्षमतेचा , त्यात ५ लिटर गावठी हातभट्टी दारू , ८० रुपये प्रति लिटर व तीस हजारांचे ३ पत्र्यांचे लोखण्डी बॅरेल मध्ये प्रत्येकी २५० लिटर करसायन जप्त केलं . कलाबाई पवार यांचा विरुद्ध भनगर कॅम्प स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे .