अप्पू हत्ती चौक व टीव्ही सेंटर चौक येथील कमानीबाबत ठेकेदारांवर कारवाईच्या आश्वासनानंतर शिवराष्ट्र सेनेचे उपोषण स्थगित

नगर – अप्पू हत्ती चौक व टीव्ही सेंटर चौक येथे कमानी उभारण्याचे मनापाने पुणे येथील ठेकेदार एजन्सीस काम दिले होते. या एजन्सीने दिशादर्शक कमान उभारण्यावेळी या जवळून गेलेल्या 1100 के.व्ही विद्युत ताराबाबत कोणत्याही प्रकारची काळजी न घेतल्याने या कमानीत विद्युत प्रवाह उतरण्याचा धोका निर्माण झाला. त्यातच  युवकांचा बळी गेला. या कमानीजवळ जातांना नागरिकांना आपला जीव मुठीत धरुन जावे लागते. या बाबत शिव राष्ट्र सेनेच्यावतीने निवेदने दिली, परंतु त्याची दखल न घेतल्याने मनपात उपोषण करण्यात आले. या उपोषणाची दखल घेत मनपा उपायुक्त यशवंत डांगे यांनी याबाबत तातडीने निर्णय घेऊ, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले.
याप्रसंगी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, दलित आघाडी प्रमुख अनिल शेकटकर, जिल्हा सचिव सुभाष आल्हाट, मध्य शहरप्रमुख अभिजित भगत, किरण रोकडे, साहिल पवार,प्रतिक नरवडे, शरद कांबळे, विशाल होंडे, गणेश भुजबळ, राज गोसावी, सिद्धांत कांबळे, नितीन जायभाय, सनी भुजबळ, शुभम सुडके, समर्थ डेरेकर आदि  उपस्थित होते.
यावेळी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे म्हणाले, कमान उभारतांना जी चुक झाली ती प्रशासनाने ठेकेदार एजन्सी यांच्या लक्षात आल्याने पुढील आठवड्यात उपोषण केले व प्रशासन व ठेकेदार यांची मनपा दालनात बैठक होऊन यानंतर संबंधितांवर कारवाईचे आश्वासन देण्यात आल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले असल्याचे सांगितले.