अल्पवयीन मुलीचा विनयभंग , आरोपीला ५ वर्षे सक्त मजुरी
अहमदनगर —अल्पवयीन मुलीची छेड काढून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला न्यायाधीश एम ए बरालिया यांनी ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व ६ हजारांचा दंड पीडित मुलीला देण्याचा आदेश दिला आहे . संतोष दिगंबर भालेकर (वय ४४ , रा. डोंगरे वस्ती ,वाढगाव गुप्ता ) असे आरोपीचे नाव आहे .अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश बरालिया यांचा समोर विनयभंग प्रकरणी सुनावणी मंगळवारी झाली . सरकारी पक्षाचा वतीने अतिरिक्त सरकारी वकील मोहन पी कुलकर्णी यांनी बाजू मंडळी .
पीडितेच्या आई वडील कामानिमित्त बाहेर गेले होते . पीडित मुलगी घरी एकटीच बसली होती . फिर्यादीचा शेजाऱ्याने कंपनीत जाऊन तुमची मुलगी आजारी आहे , असे सांगून पीडित मुली चा आई वडिलांना घरी बोलावून घेतले . त्यावेळी फिररयादीने मुलीला विचारले असता पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला . घराचा शेजारी असलेल्या आरोपीचा नातेवाईकाची मुलगी टीव्ही पाहण्यासाठी घरी आली होती . तिला तिचा घरी सोडवण्यासाठी जात असताना आरोपी तिच्याकडे आला आणि मुलीला इकडे आन मी तिला घरी सोडवतो असे म्हणत मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला . या प्रकरणी सरकारी पक्षाचा वतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले , पीडित मुलगी ,फिर्यादी पंच ,साक्षीदार , तापसी अंमलदार , जन्म मृत्यू अधिकाऱ्याची साक्ष महत्वाची ठरली .