अहमदनगर महानगरपालिकेतील नोंदणीकृत ठेकेदारांचे काम बंद आंदोलन.
ठेकेदारांचे बिल मिळत नसल्याने आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन.
अहमदनगर महानगरपालिकेतील नोंदणीकृत ठेकेदारांचे 2011 ते 2012 पासून थकीत बिले प्रत्येक वेळी पाठपुरावा पत्रव्यवहार करून देखील मिळत नसल्याने व आयुक्तांची भेट घेऊन दिवाळीपूर्वी देण्याचे आयुक्तांनी मान्य करून देखील अद्याप पर्यंत ठेकेदाराला दिले मिळालेली नाही व ठेकेदारांची कुरडू रुपयाचे दिले पालिकेमध्ये बाकी आहे परंतु मिळत नसल्याने आयुक्तांच्या दालनाबाहेर ठेकेदारांची ठिय्या आंदोलन करण्यात आले व जोपर्यंत बिल मिळत नाही तोपर्यंत ठेकेदारांची ठिय्या आंदोलन चालू राहील व ठेकेदारांनी जे काम चालू केले होते ते देखील बंद करण्यात आले आहे ठेकेदारांच्या बिलासंदर्भात प्रशासन दखल घेत नसल्याने सर्व ठेकेदारांनी आपापले काम बंद करून आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले व नागरिकांची गैरसोय होत आहे ती होऊ नये अशी सर्व ठेकेदार यांची इच्छा आहे परंतु बिल मिळत नसल्याने काम बंद करून ठिय्या आंदोलन चालू करण्यात आले असल्याची माहिती ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष आनंद पुंड यांनी दिली यावेळी सचिव शाकीर शेख, उपाध्यक्ष शोहेब शेख, उपाध्यक्ष अंबादास चौधरी, राजू लोणकर, सुनील राऊत, शहानवाज शेख, विकार काझी, अमृत वनम, संतोष बुरा आदी सह ठेकेदार उपस्थित होते.