आकाशवाणी पुण्यातूनच होणार बातम्यांचे युनिट

छत्रपती संभाजी नगरला हलवण्याच्या निर्णयाला स्थगिती अनुराग ठाकूर

पुणे : आकाशवाणी वरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट छत्रपती संभाजी नगरला हलवण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्थिती दिली आहे. हे युनिट हलवण्याचा निर्णय स्थगित करण्यासाठी खासदार प्रकाशित जावडेकर यांनी मंत्री ठाकूर यांच्यासह प्रसारभारतीचे अपूर्व चंद्र आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. जावडेकर यांच्यासह अन्य नेत्यांचीही हे केंद्र हलवण्याच्या निर्णयाला विरोध होता. मुंबई नंतर पुणे हे महाराष्ट्रातील दुसरे महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहराला वारसा आहे. पुणे आकाशवाणी केंद्र आजही सक्षमपणे चालू आहे. हे लक्षात घेता ‘पुणे शहरातील, आकाशवाणी पुणे केंद्राचा वृत्त विभाग बंद करू नये हा विभाग अधिकाधिक सक्षम करण्यासाठी येथे पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करावा’ अशी मागणी मागणी खा सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केली होती. आकाशवाणीचा पुणे वृत्त विभाग १ मे १९७५ रोजी सुरू झाला असून, येथील बातमीपत्राची लोकप्रियता संपूर्ण राज्यभारत आहे. कोरोना काळात आदेश मिळाल्यानंतर पुणे वृत्त विभागाने अल्पावधी त्याच तीन मराठी राष्ट्रीय बातमीपत्रे ताबडतोब प्रसारित केली होती. सर्व अडचणींवर मात करून दीड वर्षांहून अधिक काळ ही कामगिरी या विभागाने करून दाखवली आहे. पुढे आकाशवाणी वृत्त विभागातर्फे प्रसारित होणारी बातमीपत्र येथे 19 जून पासून पुणे केंद्रावर ऐकायला मिळणार नाहीत असे सर्वांना वाटत असतानाच आता निर्णयाला स्थगिती मिळाली आहे.