आजी-माजी सैनिकांसह कुटुंबियांचे दरेवाडी धरणे आंदोलन
आजी-माजी सैनिकांवर होत असलेल्या अन्याय आकडे लक्ष वेधण्यासाठी गाव गुंडापासून होत असलेल्या त्रासाबाबत दाद मागण्यासाठी त्यांच्यासह कुटुंबीयांनी शहरालगत नगर-जामखेड रोड वरील दरेवाडी येथील अपूर्वा कॉम्प्लेक्स च्या जागेत सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. दरेवाडी येथील करांडे मळा भागांमध्ये सर्वे नंबर 33/1 मध्ये आजी माजी सैनिकांची जागा आहे. त्याची 12 आणि 8 अ नोंदणी झाली आहे.ही जागा सैनिकांच्या कष्टाच्या पैशातून घेतली आहे या जागेत घर बांधण्यासाठी सुरुवात केली असता दरेवाडी गावातील काहींनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून कोणताही पुरावा नसताना जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने दरेवाडी येथील करांडे मळा या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत या गाव गुंडांवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनावर ठाम असल्याचा इशारा आजी माजी सैनिकांनी दिला आहे. या आंदोलनावेळी ज्योती जरे, निर्मला कापसे, पंचफुला पवार, आसराबाई मोरे, सुनिता दहातोंडे ,अनिता तांदळे ,अजय जाधव, शीला विश्वकर्मा ,सुनील लगड, नामदेव सुपेकर, बाबुराव भोसले यांच्यासह संदीप लगड, अशोक चौधरी ,शेषनारायण आठरे, संपत शिरसाठ, संजय लगड ,महादेव भोसले, प्रहार संघटनेचे विनोदसिंग परदेशी, यांस सह या ठिकाणचे जागा मालक आणि आजी माजी सैनिक उपस्थित होते