राहुरीत दोन जुळ्या मुलींचे अपहरण

राहुरी–  तालुक्यातील राहुरी खुर्द येथील दोन जुळ्या बहिणींना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळून नेल्याची घटना घडली आहे . यामध्ये राहुरी पोलीस ठाण्यात त्या मुलींच्या वडिलांनी भादवि कलम ३६३ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय . तर एक मुलगी पोलिसांना शोधण्यामध्ये यश आले असून तिस आई वडीलांच्या ताब्यात देण्यात आले आहे . तर दुसरी मुलीचा अद्याप शोध सुरू असल्याचे पोलिस सूत्रांकडून माहिती मिळाली आहे .

याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी की , राहुरी खुर्द येथील राजू एकनाथ पंडित यांच्या साडे सतरा वर्षे वयाच्या जुळ्या मुली नेहा व निकिता यांना कोणीतरी अ व्यक्तीने आमिष दाखवून चार दिवसापूर्वी पळून नेले होते . तर दोन दिवसापूर्वी यामधील एका मुलीला पोलिसांनी शोधून काढत आई – वडिलांच्या ताब्यात दिले आहे . तर दुसरी मुलीचा शोध राहुरी पोलीस करत असल्याचे पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे .