“आपला परिसर स्वच्छ ठेवा!”

संपत बारस्कर यांचे नागरिकांना आवाहन


🌿
 “आपला परिसर स्वच्छ ठेवा!” – संपत बारस्कर यांचे नागरिकांना आवाहन
📍 अहिल्यानगर, ता. 22

प्रभाग क्रमांक 1 मध्ये माझी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या पुढाकारातून भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडेभैय्या चव्हाणकिसन कसबेकिसन नांगरे, अनेक नागरिक आणि महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.


🗣 संपत बारस्कर यांचे आवाहन:
✅ घंटागाडी दररोज येत नसली तरी दोन दिवस कचरा साठवून ठेवा.
✅ आमच्याशी संपर्क करा — आम्ही कचरा उचलण्याचे नियोजन करू.
✅ रस्त्यावर कचरा टाकू नका.
✅ स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हा.
✅ आपला परिसर स्वच्छ ठेवल्यास आरोग्य सुदृढ राहते.

➡️ “स्वच्छ, सुंदर, हरित प्रभाग हा आपला उद्देश आहे. रस्ते, ड्रेनेज, लाईट, पाणी, ओपन स्पेस सुशोभीकरण, वृक्षारोपण या सर्व विकासकामांना गती दिली आहे.” — संपत बारस्कर


🛑 डॉ. सागर बोरुडे यांचे मत:
🔹 प्लास्टिकचा वापर टाळा — प्लास्टिक पिशव्यांमुळे दुर्गंधी व पर्यावरणाचे नुकसान होते.
🔹 कापडी पिशव्यांचा वापर वाढवा.


 

🌱 नागरिकांचे मत:
पूर्वी प्रभागात रस्ते नसल्यामुळे स्वच्छता कर्मचारी येत नव्हते, आता विकासकामांना गती मिळाली आहे. या कामात आमदार संग्राम जगताप यांचे मोलाचे सहकार्य आहे.
👉 नागरिकांनी विकासाबाबत आपले मत नक्की कळवावे असे आवाहन बारस्कर यांनी यावेळी केले