सावडीतील अनधिकृत गॅस रिफिलिंग सेंटरवर तोफखाना पोलिसांची कारवाई!
गॅस टाकीतून गॅस काढून रिक्षात भरताना पोलिसांना आढळले.
सावडीतील अनधिकृत गॅस रिफिलिंग सेंटरवर तोफखाना पोलिसांची कारवाई!

घरगुती गॅसचा बेकायदेशीर वापर करून वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या रिफिलिंग सेंटरवर पोलिसांनी धाड टाकत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई 19 जून रोजी दुपारी सावडी येथील जय आनंद हॉटेलच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली.
कारवाईचा तपशील:
वैभव चंद्रकांत बारस्कर (वय 25, रा. सावडी)
नितीन देवदत्त शेंडे (वय 45, रा. ब्राह्मण गल्ली, भिंगार)
हे दोघे गॅस टाकीतून गॅस काढून रिक्षात भरताना पोलिसांना आढळले.
पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केलेला मुद्देमाल —
एक्सप्रेस पंप
डिजिटल इलेक्ट्रॉनिक वजन काटा
एचपी गॅस कंपनीची घरगुती वापरायची टाकी
दुसरी एक घरगुती गॅस टाकी
बजाज कंपनीची रिक्षा (एमएच-16 बीसी 0366)
एकूण किंमत – ₹2,69,000
फिर्याद आणि तपास:
पोलिस अंमलदार सुजय हिवाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार प्रमिला गायकवाड करत आहेत.
पोलिस निरीक्षक कोकारे यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.