इंजिनिअर यश शहा यांनी अल्पसंख्यांक दिनी जैन समाजातील प्रलंबित प्रश्नांकडे वेधले प्रशासनाचे लक्ष.
जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर मार्फत २० डिसेंबर रोजी माननीय जिल्हाधिकारी भोसले साहेबांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवस नियोजन भवनात अल्पसंख्यांक समाजातील प्रतिनिधींसोबत साजरा केला.या वेळी मा. उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील मॅडम तसेच तहसीलदार,जिल्हा परिषदेचे अधिकारी,महानगरपालिकेचे अधिकारी व इतर शासकीय योजनांचे अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
जैन समाजाचे प्रतिनिधी म्हणून इंजि.यश शहा,तेजस शहा,भावेश विराणी,अभिजित लुनिया उपस्थित होते.यश शहा यांनी जैन समाजातील विविध प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले व त्यास जिल्हाधिकारी तथा संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सदर प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.यात मुख्यत्वे जैन गुरुभगवंतांना विहार दरम्यान पोलीस संरक्षण, गुरुभगवंतांची त्वरित आधारकार्ड नोंदणी तसेच उपाश्रयात जाऊन लसीकरण करणे आदी मागण्या केल्या.तसेच एक खिडकी योजना जिल्हाधिकारी कार्यालयात चालू करावी जेणेकरून अल्पसंख्यांक बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यास सुलभता होईल.मौलाना आर्थिक विकास महामंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या कर्ज योजनेतील अडचणी सांगितल्या व शासनास या बाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पत्र पाठवण्याची विनंती केली.अल्पसंख्यांक प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी जिल्हा प्रशासनास केली.
जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांना शिष्यवृत्ती संदर्भातील अडचणी कळवल्या व त्यांना सर्व खाजगी शाळांच्या मुख्याध्यापकांची मिटिंग घेऊन अडचणी सोडवण्याची विनंती केली.
अखिल भारतीय जैन श्र्वेतांबर गुजराथी महासंघ, ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशन,जैन अलर्ट ग्रुप ऑफ इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील संस्थांच्या कार्याची माहिती या वेळी शहा यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासन,पोलीस प्रशासन,महापालिका प्रशासनाचे कोविड काळातील केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले.सदर कार्यक्रमात प्रत्येक समुदायाने आपआपले विचार व मागण्या मांडल्या.यात उबेद शेख, वाहब सैय्यद,इंजि.शेख,हर्जित वधवा,तेजस शहा,भावेश विराणी,लुनिया यांनीही आपले विचार मांडले.