जिल्हा वाचनालयातर्फे राष्ट्रीय स्फूर्तीगीत स्पर्धेचे आयोजन.
शनिवार दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी
नगर-जिल्हा वाचनालयाच्या वतीने सालाबाद प्रमाणे येत्या 26 जानेवारी भारतीय गणराज्य दिनानिमित्त राष्ट्रीय स्फूर्ती गीत गायनाची स्पर्धा आयोजित केली आहे.
शनिवार दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी सकाळी ठीक दहा वाजता अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात या स्पर्धा संपन्न होणार आहेत. इयत्ता पहिली ते चौथी व पाचवी ते दहावी अशा दोन गटात या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या नंतर लगेचच विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देण्यात येतील.
अत्यंत जोशात होणाऱ्या या स्पर्धेत सर्वांनी सहभागी होऊन भारतीय प्रजासत्ताक दिनाचा आनंद साजरा करावा असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक, प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड, उपाध्यक्ष अनंत देसाई, दिलीप पांढरे, खजिनदार तनवीर खान, सहकार्यवाह डॉक्टर राजा ठाकूर, सांस्कृतिक प्रतिनिधी किरण अग्रवाल, शिल्पा रसाळ व संचालक मंडळ यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ग्रंथपाल श्री अमोल इथापे