इराण-इस्रायल संघर्ष थांबला

युद्ध बंदीची घोषणा!

🌍
इराण-इस्रायल संघर्ष थांबला — युद्ध बंदीची घोषणा!

१२ दिवस चाललेल्या इराण-इस्रायल संघर्षानंतर अखेर युद्धविराम जाहीर झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आणि कतारच्या मध्यस्थीने दोन्ही देश युद्धबंदीला तयार झाले आहेत.

📌 मुख्य घडामोडी —
🔹 सोमवारी रात्री इराणने कतारमधील अमेरिकेच्या अल-उदेद लष्करी तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला.
🔹 ट्रम्प यांनी सोशल मीडियावर युद्धबंदीची घोषणा केली.
🔹 मंगळवारी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी युद्धबंदी मान्य केली; इराणच्या माध्यमांनीही पुष्टी केली.
🔹 मात्र लगेचच इस्रायलने युद्धबंदीचा भंग केल्याचा आरोप करत प्रतिहल्ला केला; इराणने हे आरोप फेटाळले.

🚀 युद्धातील परिणाम —
👉 १००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू, ४७०० हून अधिक जखमी
👉 इराणमध्ये ९७४ मृत्यू, ३४५८ जखमी
👉 इस्रायलमध्ये २८ मृत्यू, १०००+ जखमी
👉 हजारो लोकांचे स्थलांतर
👉 भारताने ऑपरेशन सिंधू अंतर्गत ११०० भारतीयांना इराणमधून, १६० लोकांना इस्रायलमधून सुखरूप बाहेर काढले.

🌐 कोण काय म्हणतं?
🟣 अमेरिका: “इराणचा अणुकार्यक्रम मागे टाकला, शांतता प्रस्थापित केली.”
🟣 इराण: “जगातील सर्वात शक्तिशाली देशाला प्रत्युत्तर दिले.”
🟣 इस्रायल: “लष्करी ताकद सिद्ध केली, प्रादेशिक शत्रूला कमकुवत केले.”

 

⚠️ ट्रम्प यांचा यू-टर्न
“इराण एक महान व्यापारी राष्ट्र बनेल, त्यांच्याकडे अण्वस्त्रे असणार नाहीत. मला परिस्थिती लवकर शांत करायची आहे.” — डोनाल्ड ट्रम्प