१ जुलैपासून रेल्वे प्रवास महाग

लांब पल्ल्याच्या आणि एसी प्रवासाला झळ!

🚆
 १ जुलैपासून रेल्वे प्रवास महाग — लांब पल्ल्याच्या आणि एसी प्रवासाला झळ!

भारतीय रेल्वेने दीर्घ काळानंतर प्रवास भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ जुलैपासून ही भाडेवाढ लागू होईल.

📌 कुठे किती वाढ?
✅ सामान्य द्वितीय श्रेणी (Ordinary 2nd class)
👉 ५०० किमीपेक्षा कमी प्रवासाला कोणतीही भाडेवाढ नाही.
👉 ५०० किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी प्रति किमी 0.5 पैसा वाढ — म्हणजे १००० किमी प्रवासासाठी फक्त ₹2.50 जास्त.

✅ बिगर-एसी मेल / एक्सप्रेस
👉 प्रति किमी 1 पैसा वाढ — १००० किमी प्रवासासाठी सुमारे ₹10 जास्त.

✅ सर्व एसी डबे
👉 प्रति किमी 2 पैसे वाढ — १००० किमी प्रवासासाठी सुमारे ₹20 जास्त.

🚫 उपनगरी रेल्वे प्रवासी आणि हंगामी पासधारकांना दिलासा!
👉 मुंबई, कोलकाता सारख्या शहरांतील लोकल प्रवास भाडेवाढीपासून वगळला आहे.
👉 मासिक हंगामी तिकिटांचे दर जैसे थे राहणार आहेत.

💡 भाडेवाढ का?
रेल्वेच्या परिचालन खर्चात प्रचंड वाढ झाली असून, उत्पन्नात आवश्यक तो ताळमेळ बसवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

📢 मुख्य मुद्दे —
🔹 लांब पल्ल्याचे प्रवासी आणि नियमित प्रवास करणाऱ्यांना थोडी झळ.
🔹भाडेवाढ अत्यल्प असून लोकांना फारसा आर्थिक भार पडणार नाही.

🔹उपनगरी प्रवासावर कोणताही परिणाम नाही.