उमंग फाऊंडेशनच्या वतीने थंडीत गारठलेल्या गरजू घटकांना ब्लँकेटचे वाटप

जिल्ह्यात थंडीचा कहर वाढत असताना रस्त्यावरील गरजू घटकांना उमंग फाऊंडेशनच्या वतीने ऊबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. काही दिवसांपुर्वी आलेल्या थंडीच्या लाटेत शिर्डी येथील रस्त्यावर असलेल्या दोन व्यक्तींचा गारठून दुर्देवी मृत्यू झाला होता. जिल्ह्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढत असताना फाऊंडेशनच्या माध्यमातून शिर्डी येथील रस्त्यावरील गरजू घटकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनच्या सचिव वैशाली कुलकर्णी, अध्यक्ष डॉ. संतोष गिर्‍हे, रविंद्र जोशी, संजय उबाळे, प्रशांत गोंदकर उपस्थित होते.
डॉ. संतोष गिर्‍हे म्हणाले की, उमंग फाऊंडेशन सामाजिक भावनेने जिल्ह्यात सामाजिक कार्य करत आहे. शिर्डी येथे काही दिवसांपूर्वी कडाक्याच्या थंडीने रस्त्यावरील दोन व्यक्तींचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, या भावनेने फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजूंना आधार देण्यात आला आहे. रस्त्यावरील दुर्बल वंचित घटक हे समाजाचा एक घटक असून, थंडीनिमित्त त्यांना मायेची ऊब देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.