कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था, जिल्हा रुग्णालय अहमदनगर व ग्रामीण रुग्णालय जामखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबीराचे उद्घाटन संपन्न

कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था, जिल्हा रुग्णालय अहमदनगर व ग्रामीण रुग्णालय जामखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र  वाटप शिबीराचे उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, पंचायत समिती सभापती सूर्यकांत मोरे, माजी नगरसेवक मोहन पवार, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे,
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, ॲड. हर्षल डोके, संजय डोके, रमेश आजबे, अशोक धेंडे, बापूसाहेब शिंदे, काकासाहेब चव्हाण, हरीभाऊ आजबे, नय्युम शेख, जूबेर शेख, नासिर सय्यद, भीमा घोडेराव, डॉ. शशांक शिंदे, जयसिंग उगले, गणेश हगवणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राजेंद्र कोठारी, सुर्यकांत मोरे, डॉ. संजय वाघ यांनी शिबिराबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी काही दिव्यांग बांधवांचेही सत्कार करण्यात आले.प्रास्ताविक योगेश अब्दुले तर आभार डॉ. संजय वाघ यानी केले . याशिबीरामध्ये ज्यांनी जुने प्रमाणपत्र ऑनलाईन केलेले आहे, तर  ज्या दिव्यांग व्यक्तीचे प्रमाणपत्र अद्याप मिळालेले नाही तसेच ऑनलाईन झालेले नाही. अशा लाभार्थ्यांना आॅनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या  शिबीराचा दिव्यांग व्यक्तीनी मोठ्या संख्येने लाभ घेतला आहे .