कर्जत तालुक्यात बायोडिझेल सदृश्य पदार्थ जप्त .
बायोडिझेल सदृश्य ज्वलनशील पदार्थ बेकायदा बाळगल्या प्रकरणी नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध ठेकेदार अनिल चंदुलाल कोठारे यांच्यासह कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
कर्जत तालुक्यातील अळसुंदे गावचा शिवारात ठेकेदार अनिल कोठारी यांचा डांबर मिक्सिंग प्लांट आहे . तेथे जुनी हायवा , जेसीबी ,पोकलेन व इतर वाहने चालवण्यासाठी बायोडिझेल सदृश्य ज्वलनशील पदार्थ घेऊन येत आल्याची माहिती गुप्त माहिती मिळाल्या नतर महसूल विभागाचा पथकाने टँकर रंगेहात पकडून ६३ लाख ८२ हजार ५९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला , या प्रकरणी टँकर चालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . महसूलचे पुरवठा निरीक्षक श्रीरंग पांडुरंग अनारसे यांनी कर्जत पोलिसांत फिर्याद दिली आहे .