किराणा दुकानात मद्य विकू देणार नाही – विखे

राहता —  शिर्डी मतदार संघातील कोणत्याही किराणा दुकानात मद्य विक्री करू देणार नाही , किराणा दुकानात मद्य सुरु करण्याचा  राज्य सरकारचा निर्णयाला कडाडून विरोध करणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ सुजय विखे यांनी केले .  लोणी (ता. राहता) येथील श्री वरद विनायक सेवाधामचा स्वागत कमानीचे उदघाटन डॉ सुजय विखे यांचा हस्ते दिनांक ४ रोजी झाले . त्यावेळी ते बोलत होते .  सेवाधामचे संथपक महंत उद्धव मंडलिक महाराज .जगन्नाथ पाटील महाराज ,विश्वनाथ मंडलिक महाराज , ट्रक सोसायटीचे अध्यक्ष नंदकिशोर राठी , बाळासाहेब आहेर या वेळी उपस्थित होते .

डॉ सुजय विखे म्हणाले कि , संसदेत मी गोरगरीब व सामान्य जनतेच्या आशीर्वादाने पोहोचलो आहे . गोरगरिबांची बाजू मी संसदेत मांडण्याचे कर्तव्य मी सातत्याने करत राहणार असून माझ्या या भूमिकेमुळे कोणाला काही त्रास होत असे तर त्याची मी काळजी करणार नाही . किराणा दुकानात मद्य विक्री करण्याचा निर्णय दुर्दैवी असून या निर्णयाला माझा ठाम विरोध आहे . कोणीही आडवे आले तरी  त्याची तमा  न बाळगता चुकीची प्रथा पडू देणार नाही .  जर किराणा दुकानात कुणी मद्य विक्री करताना आढळून आल्यास त्या दुकानदाराचे दुकान सील करू असेही त्यांनी सांगितले .