अहमदनगर : मेट्रो न्यूज
केडगाव येथील भैरवनाथ मंदिरात “एक तास राष्ट्रवादीसाठी ” या बैठकीतून आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता.महाराष्ट्राच्या जडणघडणीत राष्ट्रवादी पक्षाचे मोठे योगदान राहिले आहे. केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल सुरु आहे. समाजकारणाचा वारसा प्रत्येक ग्रामीण भागात व शहरी भागात पक्षाचे लोकप्रतिनिधी, पुढारी व कार्यकर्ते पुढे घेऊन जात आहे. पक्षाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संवादातून हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, व्यापार व उद्योग सेलचे अनंत गारदे, ओबीसी सेलचे अमित खामकर, विशाल जाधव, सोनू घेंबूड, तुषार टाक, फुले ब्रिगेडचे दिपक खेडकर, सरचिटणीस उमेश धोंडे, किरण कोतकर, तुषार कोतकर, रोहिदास कोतकर, लक्ष्मण करांडे, परबती ठुबे, सुधाकर कापरे, सुरेश गारुडकर, तुकाराम गारुडकर, रोकडे मामा, खोमणे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप यांनी शहरासह केडगाव उपनगरात देखील विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. केडगावचा विकास होण्यासाठी ते नेहमी तत्पर राहतात. आमदार संग्राम जगताप यांनी धर्म व जातीचे राजकारण न करता, विकास हाच राजकारण अजेंडा घेऊन सर्वसामान्यांना सुविधा देण्याचे काम केले. शहर हे विकासाच्या दृष्टिकोनाने मार्गक्रमण करीत असून, केडगाव उपनगराचा देखील चेहरा-मोहरा बदलण्यासाठी त्यांनी योगदान दिले आहे , आमदार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारण व समाजकारणात केडगावमध्ये सक्रीय राहणार असल्याचे केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांशी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी मनमोकळेपणे संवाद साधला.