भिंगारमध्ये महिलांसाठी मेळाव्याचे आयोजन….

महिलांच्या आरोग्यावर मार्गदर्शन

अहमदनगर : मेट्रो न्यूज 

 
भिंगार येथील  चौंडेश्‍वरी मंदिरात महिला दिनानिमित्त  समस्त कोष्टी समाजाच्या वतीने महिलांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी महिलांच्या आरोग्यावर मार्गदर्शन  करण्यात आले. . चौंडेश्‍वरी मंदिरात महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या मेळाव्याप्रसंगी स्त्री रोग व कॅन्सर तज्ञ डॉ. ऋषीकेश पंडित, अध्यक्षा अनिता लोखंडे, सचिव ज्योती उदबत्ते, अनिता सोळसे, अनिता सगम,  शिवम भंडारी, विठ्ठलराव लोखंडे, शंकरराव लोखंडे, देविदास कुमठेकर आदींसह सर्व समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी सध्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे आणि त्याबाबत महिलांनी जागृत राहायला हवे ,  कॅन्सरची प्राथमिक लक्षणे  कोणती असतात,  यासारख्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे महिलांनी स्वतच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हाव,महिलांचे आरोग्य चांगले असेल तर त्यांना  आपल्यातील  कलागुणांकडे लक्ष  देता येते.

तसेच महिलांनी  आपले आरोग्य सदृढ ठेवून  स्वत:च्या पायावर उभे राहून कुटुंबाची प्रगती साधली  पाहिजे , असे यावेळी महिलाना सांगण्यात आले.  महिलांनी आत्मनिर्भर होणे आवश्यक असते.  महिला आत्मनिर्भर झाल्यास कुटुंब व समाजाची प्रगती साधली जाते. असे मार्गदर्शनपर भाषण करून महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे भाष्य यावेळी करण्यात आले.