कैलास गिरवले प्रकरणात पोलिसांवर गुन्हा दाखल .

पोलीस अधीक्षक कार्यालयातील गोंधळ प्रकरणात चौकशी साठी ताब्यात घेतलेल्या माजी नगरसेवक कैलास गिरवले याना स्थानिक गुन्हे शाखेचा कार्यालयात काठीने मारहाण झाली होती . या प्रकरणी सीआयडी चौकशीवरून भींगार पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला . 
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचा उपाधीक्षक वैशाली मुळे  यांनी भिंगार ठाण्यात येऊन  फिर्याद दिली आहे .त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेत नेमणूक असलेले पोलीस नाईक रवींद्र कर्डीले , विजय ठोंबरे , व इतरांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे . मृत माजी नगरसेवक गिरवले याना भींगार कॅम्प ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपासणीसाठी ८ एप्रिल २०१८ रोजी रात्री साडेबाराच्या चौकशीसाठी त्यांचा घरातून एलसीबी कार्यालयात  आणले होते . तेथे एलसीबी चा दोन कर्मचाऱ्यांनी त्यांना काठीने मारहाण केली होती . हि बाब सीसी टीव्ही फुटेच तपासात निष्पन्न झाली होती . या प्रकरणी पोलीस रवींद्र कर्डीले व विजय ठोंबरे व इतरांवर गुन्हा नोंदवला . गुन्ह्याचा पुढील तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांचाकडे वर्ग करण्यात आला आहे .