रक्तदानाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन.

भारताच्या पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त  माळीवाडा येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर महात्मा फुले जयंती उत्सव समिती व फिनिक्स फाउंडेशन च्या वतीने रक्तदान शिबिर व मोतीबिंदू नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन महिला बालकल्याण समितीचे सभापती पुष्पाताई बोरूडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी फिनिक्स फाउंडेशन चे जालिंदर बोरुडे, जयंती उत्सव समितीचे कमलेश जंजाळे, बंडू आंबेकर, भारत जाधव, गणपत चेडे, अक्षय चेडे, शुभम आंबेकर, ओमकार फुलसौंदर, हरिभाऊ मस्के आदीसह उत्सव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारताच्या पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये युवक युवती यांनी मोठ्या संख्येने येऊन रक्तदान केले व ज्येष्ठ नागरिक यांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली यामध्ये 117 रक्तदात्यांनी रक्तदान केले  तर 140 जणांचे मोतीबिंदू तपासणी करण्यात आली.