क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुलेंचा माळीवाड्यात पुतळा उभारावा महापौर-आयुक्तांना निवेदन
नगर – आद्य समाज सुधारक महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा देऊन समाज सुधारणेच्या कार्यात योगदान देणार्या व प्रवाहाच्या विरोधात जावून समाजाचा रोष पत्करुन स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणार्या सावित्रीबाई फुले यांचा पुतळा माळीवाडा येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याशेजारी उभारावा, अशी मागणी ओबीसी, व्हीजे,एनटी जनमोर्चाच्यावतीने करण्यात आली. जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने महापौर रोहिणी शेंडगे यांची भेट घेऊन मागणी केली. तसेच आयुक्त शंकर गोरे यांनीही मागणीचे निवेदन दिले.
सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्याचा महापालिकेचा मानस असून, तसा ठराव संमत असल्याने प्रत्यक्ष कृती केली जाईल, असे आश्वासन महापौर सौ.शेंडगे यांनी शिष्टमंडळाला दिले.
निवेदनावर माजी महापौर अभिषेक कळमकर, भगवान फुलसौंदर, ओबीसीचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, जिल्हाध्यक्ष सुनिल भिंगारे, माजी नगरसेवक विक्रम राठोड, समता परिषदेचे दत्ता जाधव, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, भिंगार अर्बन बँकेचे संचालक विष्णू फुलसौंदर, माजी नगरसेवक विष्णूपंत म्हस्के, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, प्रा.सुनिल जाधव, माजी नगरसेवक अशोक दहिफळे, परेश लोखंडे, माऊली गायकवाड, शौकत तांबोळी, छाया नवले, सविता घायतडक, शशिकांत पवार, रमेश बिडवे, विनोद पुंड, संजय सागावकर, डॉ.सुदर्शन गोरे, बजरंग भुतारे, नितीन भुतारे, हर्षल म्हस्के, अनिल इवळे, सुषमा पडोळे, संजय आव्हाड, वनिता बिडवे, सुशिला सहानी, कैलास दळवी, रमेश सानप, राजेंद्र पडोळे, अभिजित कांबळे, आर्यन गिरमे आदि उपस्थित होते.