क्रीडा क्षेत्रात युवकांचे चांगले आकर्षण – संदीप मिटके.

स्पर्धेत सहभागी झालेल्या संघाचे कौतुक.

शहरातील युवकांनी क्रीडा क्षेत्रात चांगलेच आकर्षण दाखवले आहे. तसेच मैदानी खेळाणे युवकांचा सर्वांगीण विकास होतो. रोगप्रतिकारशक्ती वाढीस लागते व मन प्रसन्न राहून, शरीर सुदृढ बनते. खेळामुळे युवक एकत्र येऊन सामाजिक एकतेची भावना वृद्धिंगत होत असल्याचे प्रतिपादन श्रीरामपूर विभागीय पोलीस अधिक्षक संदीप मिटके यांनी केले.अनंत बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने शहरातील पंचपीर चावडी येथील सहकार क्रीडा मंडळ येथे आयोजित करण्यात आलेल्या सरकार चषक व्हॉलीबॉल स्पर्धेचे चेंडू टोलवून सामन्याचा शुभारंभ करताना श्रीरामपूर विभाग पोलीस अधीक्षक संदीप मिटके, अनंत बहुउद्देशीय संस्थेचे फैय्याज शेख केबलवाला, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे, कासम केबालवले, डॉ .अनिल बोरगे, राष्ट्रीय खेळाडू राजेंद्र सुद्रीक, आनंद सत्रे, सुदर्शन ढवळे, अभिजीत खरपुडे, सैफ शेख, रहीम शेख, जयदीप आमटे, हसन शेख, अरबाज बागवान, पप्पू सोनवणे आदीसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.