खासदार विखे यांच्या आरोग्यासाठी कर्जत मध्ये प्रार्थना
अहमदनगर जिल्हा दक्षिणचे खा.डॉ. सुजय विखे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर जे कोरोनाचे संकट ओढवले आहे.तसेच विखे कुटुंबाबरोबरच संपूर्ण महाराष्ट्र आणि देशावर कोरोनाचे संकट ओढवले आहे.यासाठी कर्जत येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांनी श्री संत सदगुरु गोदड महाराज यांच्या मंदिरात महाआरती चे आयोजन केले होते.
यावेळी विखे कुटुंबीयांसह महाराष्ट्र देश आणि सबंध जगावरचे कोरोनाचे संकट टळू दे..! असे साकडे भाजपाच्या पदाधिकार्यांच्यावतीने श्री. संत सदगुरु गोदड महाराज यांना घालण्यात आले. यावेळी यावेळी कर्जत येथील प्रसिद्ध उद्योजक अरविंद काळोखे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ,भाजपा किसान मोर्चाचे सुनील यादव, दादासाहेब सोनमाळी काकासाहेब धांडे,दिग्विजय देशमुख,गणेश क्षीरसागर,अनिल गदादे,रावसाहेब खराडे,रिपाइंचे संजय भैलुमे,विनोद दळवी, डॉ.संदीप बरबडे आदि. उपस्थित होते…
अरविंद काळोखे उद्योजक यावेळी बोलताना म्हणाले की विखे कुटुंबीयांनी चार पिढ्यांपासून या राज्यातील व जिल्ह्यातील जनतेची सेवा केली आहे. कोरोना काळामध्ये खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी गोरगरीब नागरिकांना मोफत औषधे उपलब्ध करून दिली. आजही हजारो नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देण्याचे काम हे कुटुंब करत आहे. यामुळे आज माझ्यासह कर्जत तालुक्यातील सर्व नागरिकांनी ग्रामदैवत गोदड महाराज मंदिरामध्ये संपुर्ण विखे कुटुंबीयांना व खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना संपूर्णपणे बरे वाटून ते तातडीने जन सेवेत पुन्हा रुजू व्हावे यासाठी प्रार्थना केली आहे