जय किसान कंपनी तर्फे प्रमुख विक्रेत्यांचे स्नेह संमेलन
झुआरी अग्रो केमिकल लिमिटेड गोवा हि देशातील खत उत्पादक व पुरवठा करणारी एक अग्रगण्य कंपनी आहे . सन १९६७ पासून शेतकरी बांधवाना दर्जेदार खते ,औषधे व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा जयकिसान ब्रॅण्डखाली पुरवठा करत आहे . नुकतीच कंपनीने महाराष्ट्र , गोवा ,कर्नाटक व आंध्रप्रदेश येथील नामांकित १०० विक्रेते बंधूं सोबत विक्रेता संमेलन गोवा येथे आयोजित केले होते , सदर संमेलनास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री मदन पांडे ,श्री नितीन कंटक कार्यकारी संचालक, श्री हर्षदीप सिंग उपाध्यक्ष विक्री ,श्री दिलीप चव्हाण महाव्यवस्थापक विक्री यांनी मार्गदर्शन केले .
कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना श्री मदन पांडे यांनी विक्रेते बंधू हि आमची प्रमुख ताकद असल्याचे प्रतिपादन केले ,तसेच अंतराष्ट्रीय स्तरावरील खत व्यवस्थापना बाबत माहिती दिली .श्री हर्षदीप सिंग यांनी आपल्या भाषणात जय किसान हा ब्रँड पूर्ण देशात यशस्वीपणे व्यवसाय करत असल्याचे नमूद केले , श्री दिलीप चव्हाण यांनी फॉस्फेट युक्त खतांमध्ये २०:२०:०:१३ व सुपर १६ ( सुपर फॉस्पेट )या ग्रेड बाबत मार्गदर्शन केले .व येणाऱ्या काळात शेती आणखी समृद्ध करण्यासाठी रासायनिक खतांबरोबर कंपनी इतर उत्पादने केम्फ्री, वॅमॅक्स ,बयो २० , नवरत्ना पॉवर बाबत शेतकऱ्यांना शिक्षित करण्याचा सल्ला दिला . कार्यक्रमात विविध उत्पादन प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या २४ विक्रेत्यांना सन्मानित करण्यात आले .
आभार प्रदर्शन श्री रवींद्र देशमुख विभागीय व्यवस्थापक नागपूर यांनी केले .