जिल्ह्यात पहिलीतील प्रवेशासाठी मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक

जिल्ह्यातील शाळा आजपासून  उघडत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना बोलावून पुष्प देऊन स्वागत करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने आखले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार यंदा शाळा प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची संख्या ३८ हजार २०१ असून त्यापैकी सर्वाधिक सतरा हजार ९३१ मुलींची संख्या आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षण विभागाने जय तयारी केली आहे. दोन दिवसांपासून सर्व शिक्षकांसह यंत्रणेने शाळा उघडून वर्ग खोल्या, पाण्याच्या टाक्यांच्या स्वच्छती केली आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके देता यावीत, यासाठी शाळांमध्ये पुस्तके पोहोच झाली आहेत. विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जाणार आहे. शाळा प्रवेशोत्सव आणि नवागतांचे स्वागत हा उपक्रम राबवणार आहे. विद्यार्थ्यांना मिष्ठांन भोजन व इतर स्वागत त्याची तयारी करण्याच्या सूचना निश्चित व्हिसीद्वारे शिक्षण विभागाने सर्व विस्ताराधिकारी आणि केंद्रप्रमुखांना दिल्या आहेत. एक गणवेश व पाठ्यपुस्तके पहिल्या दिवशी देण्याचा निर्देश आहेत. डिसेंबर २०२२ मध्ये स्थानिक पातळीवर केलेल्या सर्वेक्षणात, यंदा पहिली प्रवेशासाठी ३७, २०१ विद्यार्थी दखलपात्र असल्याचे समोर आले आहे. त्यात १७,७७६ मुले, व १७,९१६ मुलींचा समावेश आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रवेशासाठी वाढलेली संख्या ‘बेटी बचाव बेटी पढाव’ अंतर्गत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आतापर्यंत जिल्हा परिषद शाळेत २०,३४०० तर खाजगी शाळेत १३२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.