दहावी परीक्षेसाठी नगर जिल्ह्यातून ६८ हजार ७७१ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यामध्ये ३७ हजार ८७४ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. एकूण ६४ हजार १३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ९४.४८ इतकी आहे. नगर जिल्हा हा पुणे विभागात दुसऱ्या स्थानी राहिला आहे. पहिल्या स्थानी पुणे व सोलापूर जिल्ह्याने बाजी मारली आहे. या दोन्ही जिल्ह्यांचा ९६.६% निकाल लागला आहे. नगर जिल्ह्यातील उत्तीर्ण ६४,१३२ विद्यार्थ्यांमध्ये २१,८३६ विद्यार्थी उच्च श्रेणी घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. २४ हजार ४२३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी १४,२९२ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली आहे. ३५८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुली उत्तीर्ण होण्याची जिल्ह्याची टक्केवारी ९६.६२ असून मुलांची ९२.६९% आहे. दरम्यान दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात एकूण १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये ८४ हजार ४१६ मुले असून ७३ हजार ६२ मुली आहेत. राज्यात एकूण ५३३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. दहावीच्या परीक्षेत राज्यातील ९३.८३% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
Next Post