झेंडीगेट बेपारी मोहल्ला परिसरातील रस्ते मॉडेल स्वरूपात होणार – आ.संग्राम जगताप.

शहरात विकासात्मक कामे झपाट्याने चालू असून कामाबरोबर उच्चप्रतीचा दर्जा देखील राखला जात आहे. झेंडीगेट बेपारी मोहल्ला ते नालबंद खुंट ते झेंडीगेट पर्यंतच्या रस्ता डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेवक मुजाहिद (भा) कुरेशी, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, नज्जु पहिलवान, मन्सूर शेख, वाहिद कुरेशी, मुक्तार कुरेशी, वाजीत जहागीरदार, हरी सिंग, अक्तर कुरेशी, सर्वर कुरेशी, रोहिदास चीपोले, तसलीम डायमंड, निसार बागवान, शमशेर खान, नितीन कचकल, रवी बोरा, आसिफ शेख, शहेबाज शेख, अजमत ईराणी, मोहम्मद ईरानी, इमरान जागीरदार आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे आ. जगताप म्हणाले की झेंडीगेट बेपारी मोहल्ला ते नालबंद खुंट ते झेंडीगेट रस्त्याच्या कामासाठी नगरसेवक मुजाहिद (भा) कुरेशी यांनी पाठपुरावा करून निधी मिळवला तसेच आरसीसी गटारचे कामदेखील प्रभागांमध्ये पूर्ववत झाले असून रस्ता डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला त्यामुळे परिसरातील रस्ते मॉडेल स्वरूपात होणार असल्याची भावना व्यक्त केली तसेच प्रास्ताविकात नगरसेवक मुजाहिद (भा) कुरेशी यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून अनेक विकासात्मक कामे मार्गी लावण्याचे सांगितले तसेच परिसराची विकासात्मक कामाने आदर्श प्रभागा कडे वाटचाल चालू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले पाहुण्यांचे स्वागत वाहीत कुरेशी यांनी केले .